Home पुणे “राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात”

“राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात”

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच रूपाली चाकणकरांसह समता परिषदेच्या अनेक कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

समता परिषदेच्या वतीने पुण्यात ओबीसी बचाव मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. शनिवारवाड्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र ओबीसी समाजाच्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिलेली नव्हती. तरीही समता परिषदेच्या नेते तसेच कार्यकर्त्यांनी हा मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पुणे पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, तसेच ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं, ही समता परिषदेची मागणी आहे. त्यासाठीच हा मोर्चा काढण्यात येणार होता.

महत्वाच्या घडामोडी-

सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री होणार का? यावर शरद पवार म्हणतात….

“शरद पवार एकवेळ कोरोनाबाबत निगेटीव्ह राहतील पण धनगर आरक्षणाबाबत पॉझिटिव्ह आहेत”

“MDH मसालेचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन”

…त्यामुळे आता ठाकरे सरकारला हिंदू शब्दाचेही वावडे वाटू लागले आहे- अतुल भातखळकर