Home देश आपल्याला नियमांचं पालन करुन या युद्धाचा सामना करायचा आहे- नरेंद्र मोदी

आपल्याला नियमांचं पालन करुन या युद्धाचा सामना करायचा आहे- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : कोरोनासारखं संकट कधीही पाहिलं नाही, हे अभूतपूर्व संकट आहे, मात्र पराभव मनुष्याला मान्य नाही, सतर्क राहून, नियमांचं पालन करुन अशा युद्धाचा सामना करायचा आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज त्यांनी देशाला संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते.

21 वं शतक हे भारताचं आहे हे आपण ऐकत आलो आहे, कोरोना संकटकाळातही जगभरात जी परिस्थिती आहे ते अभूतपूर्व आहे, मात्र 21 वं शतक हे भारताचं असावं हे केवळ स्वप्न नको तर जबाबदारीही हवी, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

दरम्यान, यापूर्वी भारतात पीपीई किट किंवा N95 मास्क बनत नव्हते, मात्र आता 2-2 लाखांचं उत्पादन होत आहे, हे संकटामुळे शक्य झालं, स्वावलंबी होऊ शकलो, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

भाजपाने ऐनवेळी बदलला विधानपरिषद उमेदवार; पंकजा मुंडेंच्या ‘या’ कट्टर समर्थकला उमेदवारी

तुमचा भाऊ म्हणून मी सदैव तुमच्यासोबत; जयंत पाटलांचं परिचारिकांना भावनिक पत्र

करोनामुक्ती लढ्यातील परिचारिकांच्या सेवेची मानवतेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल- अजित पवार

भाजपला सोडचिठ्ठी देण्यावरुन एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा; म्हणाले..