मुंबई : ठाकरे सरकारला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ते ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
या सरकारनं कसंबसं एक वर्ष पूर्ण केलं. महाभकास असं हे एक वर्ष आहे. सर्व आघाडीवर हे अपयशी सरकार झालं आहे., असं म्हणत अतुल भातखळकर यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच मराठा आरक्षण, कोरोनाचं संकट असेल या सगळ्यात सरकार अपयशी ठरल्याचं भातखळकर म्हणाले.
दरम्यान, अतुल भातखळकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला आहे. नावातच यु आणि टी असल्यामुळे हे सरकार यु टर्न घेत आहेत असं म्हणत भातखळकरांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. यावेळी आता शिवसेना अजानची स्पर्धा भरवत आहे. हा एक यु टर्न आहे. विकास कामाला स्थगिती देणं किंवा खेळ खंडोबा करणं हे या महाभकास सरकारचं काम असल्याचं म्हणत भातखळकरांनी सरकारवर टीका केली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“तुमच्या कानाला आणि हृदयाला त्रास व्हावा म्हणूनच उद्धव ठाकरेंनी माझी नियुक्ती केली आहे”
“सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या”
“धक्कादायक! नागपूरमध्ये वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरुन फरफटत नेलं”
“शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नितीन राऊत यांचा गेम केला”