…तर राहुल गांधींना आधी लग्न करावं लागेल- रामदास आठवले

0
211

मुंबई : नवे कृषी कायदे दोन उद्योगपतीचे आहेत, असं म्हणत काँग्रेसनेते राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीका केली होती. त्यावरून रिपाईचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधींवर खोचक निशाणा टीकास्त्र सोडलं आहे. ते वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलत होते.

मोदी सरकारने नवे कृषी कायदे अदानी आणि अंबानींसाठी आणल्याची टीका होते. मात्र, ती अत्यंत चुकीची आहे. त्यांना नफा कमवायला अनेक दुसरे उद्योग आहे. त्यांना शेतीवर उद्योग करायचे आहेत असं नाही. राहुल गांधी म्हणतात की ‘हम दो, हमारे दो’. राहुल गांधींना असं म्हणण्यासाठी लग्न करावं लागेल. हम दो, हमारे दो असा आरोप करण्यात काहीही तथ्य नाही. हा कायदा चांगला आहे, असं रामदास आठवले म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

संभाजी भिड़े गुरूजी यांचे कान भरवल्यामुळे आपलं निलंबन झालं- नितिन चौगुले

अहो आधी तुमची मानसिकता बदलायला हवी, मग…- अतुल भातखळकर

…अन्यथा कोरोना पुन्हा येईल; भगतसिंह कोश्यारी यांचा इशारा

“उद्धवजींचे सरकार ना रामाचं…ना भिमाचं…नाही काही कामाचं”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here