Home महत्वाच्या बातम्या “उद्धवजींचे सरकार ना रामाचं…ना भिमाचं…नाही काही कामाचं”

“उद्धवजींचे सरकार ना रामाचं…ना भिमाचं…नाही काही कामाचं”

पालघर : उद्धवजींचे सरकार ना रामाचं…ना भिमाचं…नाही काही कामाचं, असं म्हणत  रिपाईचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या काव्यशैलीत ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ते पालघरमध्ये बोलत होते.

रिपाईकडून पालघर जिल्हातील दिवेकर वाडी येथे आदिवासी बहुजन मेळावा आयोजित केला होता. या आदिवासी बहुजन मेळाव्यात रामदास आठवले यांनी ही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे एक मागणी केली आहे.

मराठा समाजाला एससी, एसटी, ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये त्यांना स्वतंत्र प्रवर्ग तयार करून आरक्षण द्यावं. कथित सवर्ण समाजातील गरीबांना ज्या प्रकारे 10% आरक्षण देण्यात येतं त्याप्रकारे देशातील कथित क्षत्रिय समाजाला 10% आरक्षण देण्यात यावं अशी मागणी आठवले यांनी नरेंद्र मोदींकडे केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

दिशा बरोबर झालं आहे तेच पुजा बरोबर होणार असेल तर…- करुणा शर्मा

“तुम लाख कोशिश करो मुझे हराने की, जब जब मैं बिखरा हूँ, दुगनी रफ्तार से निखरा हूँ”

तुम्ही तेव्हाच आमच्याशी लव्ह मॅरेज केलं असतं तर राज्यात युतीची सत्ता असती; गुलाबराव पाटलांचा टोला

“आज महाराज असते तर त्यांनी धनंजय मुंडे, मेहबूब शेख, संजय राठोड यांचा कडेलोट केला असता”