जळगाव : शहरातील बळीराम पेठ परिसरातील भाजपच्या वसंत स्मृती या जिल्हा कार्यालयाच्या इमारतीच्या दरवाजाजवळ काल रात्री अज्ञात व्यक्तीने कचरा जाळला असल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली .
नेहमीप्रमाणे दररोज सकाळी कार्यालय उघडणाऱ्या कर्मचाऱ्याच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. अगदी दरवाजात आणून कचरा जाळल्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांना ही माहिती देण्यात आली. त्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी या कार्यालयाला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी पोलिसांना सूचना दिल्यावर शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी एका मनोरुग्ण संशयिताला ताब्यात घेतलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“मुंबईत सर्वत्र फटाके फोडण्यास बंदी, महापालिकेनं केलं परिपत्रक जारी”
“अखेर भूषण प्रधानने व्यक्त केल्या भाग्यश्रीबद्दलच्या प्रेमभावना”
“अखेर भूषण प्रधानने व्यक्त केल्या भाग्यश्रीबद्दलच्या प्रेमभावना”
मी अर्णब गोस्वामींना जेलमध्ये भेटायला जाणारच, हिंमत असेल तर अडवून दाखवा- राम कदम