Home महत्वाच्या बातम्या “ती आपल्यातून निघून गेली, पण तिच्या मारेकर्‍याला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी”

“ती आपल्यातून निघून गेली, पण तिच्या मारेकर्‍याला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी”

मुंबई : हिंगणघाट येथे प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून मारण्याची धक्कादायक घटना घडली होती. अखेर त्या तरुणीची मृत्यूशी सुरु असलेली झुंज संपली. आज सकाळी 6.55 वाजता तिने अखेरचा श्वास घेतला. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ती आपल्यातून निघून गेली असली तरी तिच्या मारेकर्‍याला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी. पुन्हा कोणत्या युवतीला अशा दुर्दैवी प्रसंगाला सामोरे जावे लागणार नाही, अशी अद्दल त्याला घडली पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हिंगणघाटमधील दुर्दैवी घटनेतील पीडितेला अखेर आपल्या प्राणाला मुकावे लागले. तिच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्यासाठी शक्ती मिळावी, यासाठी मी प्रार्थना करतो, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जो त्रास माझ्या मुलीला झाला तो त्रास आरोपीला झाला पाहिजे. आरोपीला आमच्या स्वाधीन करा, असं म्हणत पीडितेच्या वडिलांनी संताप व्यक्त केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

त्या हरामखोराला जागेवरच ठार मारा; हिंगणघाट प्रकरणावर निलेश राणेंची संतप्त प्रतिक्रिया

जो त्रास माझ्या मुलीला झाला तो त्रास आरोपीला झाला पाहिजे- पिडीतेच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया

काँग्रेसचा ‘हा’ नेता म्हणतो; राज ठाकरेंनी मनसेचं इंजिन भाजपला भाड्याने दिलं आहे

अजित पवार थोड्या दिवसांनी शिवसेनाही चालवतील- मनसेचा शिवसेनवर पलटवार