मुंबई : महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडमध्येही भाजपला मोठा फटका बसल्याचं दिसत आहे. कारण झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपची पीछेहाट झाली आहे. तर काँग्रेसने मोठी मुसंडी मारली आहे, यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
झारखंडच्या जनतेने नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजप यांचा अहंकार धुळीस मिळवला आहे. लोकशाहीचा विजय झाला आहे, असं ट्विट नवाब मलिक यांनी केलं आहे.
झारखण्ड की जनता ने
मोदी जी ,अमित शाह और बीजेपी के अहंकार को चकनाचूर कर दिया
लोकतंत्र की जीत हुई।#Jharkhand #JharkhandAssemblyElections#JharkhandElectionResults @MumbaiNCP @MumbaiNCP @PTI_News @ANI— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) December 23, 2019
सकाळी मतमोजणी सुरु झाल्यापासून काँग्रेस आघाडीने मुसंडी मारली. राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी 41 जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे काँग्रेस आघाडीनं बहुमताचा आकडा सहज गाठल्याची महिती मिळाली आहे.
दरम्यान, गेल्या दीड वर्षाच्या काळात भाजपच्या हातून 7 राज्यं गेली आहेत. महाराष्ट्रात भाजपने नुकतीच आपली सत्ता गमावली होती. आता झारखंडमध्येही सत्ता जाणार असल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का आहे.
महत्वाच्या घडामोडी-
-झारखंडमध्ये काँग्रेसची सत्ता येणार ; एक्झिट पोलने वर्तवला अंदाज
-मी पाहिलेले उद्धव ठाकरे हे नाहीत, ते ‘या’ थराला जातील असं वाटलं नव्हतं- देवेंद्र फडणवीस
-कटक वनडेत भारताचा विराट विजय; 2-1 ने जिंकली मालिका
-ही माती माझी ओळख सांगते, जितेंद्र आव्हाडांनी कवितेतून दर्शवला नागरिकत्व कायद्याला विरोध