मुंबई : मुंबई शहरात कधीच कोणाला उपाशी पोटी झोपावं लागू नये म्हणून मनसेनं एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी पुढाकार घेऊन या उपक्रमाला सुरुवात केली आहे. माणुसकीचा फ्रीज असं या अनोख्या उपक्रमाचं नाव आहे.
कोणीही उपाशीपोटी झोपू नये, या प्रामाणिक भावनेने आम्ही एक उपक्रम सुरू करत आहोत. आमच्या माहीम व दादरच्या कार्यालयात एक फ्रीज ठेवत आहोत. नागरिकांनी घरात शिजवलेलं अन्न, फळं, बिस्किटं यापैकी जे काही आपल्याकडे असेल ते स्वेच्छेने या फ्रीजमध्ये आणून ठेवाव्यात. व जो भुकेला आहे त्यांने त्या घेऊन हे अन्न घेऊन जाव्यात, अशी ही संकल्पना आहे., असं नितीन सरदेसाई यांनी सांगितलं आहे.
आमच्या सर्व सामाजिक उपक्रमांना नेहमीच आपले सहकार्य लाभले आहे तसेच यापुढेही लाभेल अशी आशा आहे., असं ट्विट नितीन सरदेसाई यांनी केलं आहे.
कुणीही उपाशी पोटी झोपू नये… पक्षाचे नेते श्री. नितीन सरदेसाई ह्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दादर-माहीम शाखेत समाजभिमुख असा अभिनव उपक्रम…! #मनसेउपक्रम #मनसेशाखा #महाराष्ट्रसैनिक #महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज्य pic.twitter.com/SBeWQ0tpMo
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 26, 2020
महत्वाच्या घडामोडी-
एमआयएमच्या ‘त्या’ 2 आमदारांना अटक करा- अतुल भातखळकर
पुण्यातील युवासेनेच्या उपनेत्याने मनसेचा झेंडा खांद्यावर घेतला; राज ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती
…पण हे सरकार अहंकारानं भरलेलं आहे; मंदिरं खुली करण्यावरून प्रविण दरेकरांची ठाकरे सरकारवर टीका