मुंबई : दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राणे पिता पुत्रांवर टीका केली होती. भाजप खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर पलटवार केला होता. यावर नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला शिवसैनिकच योग्य वेळी उत्तर देलीत, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याविषयात मला काही बोलायचे नाही. पण त्यांनी केलेल्या विधानांवर कोणी प्रतिक्रिया देत नाही, याचा अर्थ तुम्हीच समजून घ्या. त्यांची किंमत काय आहे. विषय शिवसेनेचा आहे. शिवसैनिकच योग्यवेळी त्यांना उत्तर देतील कारण ते पूर्वश्रमीचे शिवसैनिक आहेत, असं अशोक चव्हाण म्हणाले.
दरम्यान, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकासानीची पाहणी करण्यासाठी अशोक चव्हाण औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी-
पावसाळा संपला तरी बेडकांचा डराव-डराव काही संपलेला नाही; विनायक राऊतांचा नारायण राणेंना टाेला
जर सरकारवर विश्वास नसेल तर मराठा संघटनांनी त्यांचा वकील जरुर लावावा- अशोक चव्हाण
“अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण”
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; ‘या’ कारणासाठी रोहित शर्मा-इशांत शर्मा संघाबाहेर