Home क्रीडा दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा 8 विकेटनी पराभव

दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा 8 विकेटनी पराभव

तिरुवनंतपुरम : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा 8 विकेटनी पराभव झाला आहे. ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे भारताला हा सामना गमवावा लागला.

भारताने रचलेला 171 धावांचा डोंगर वेस्ट इंडिजनं सहजरित्या पार केला. या सामन्यातही भारतानं मोक्याच्या क्षणी कॅच सोडल्यामुळं भारताला हा सामना गमवावा लागला.

वेस्ट इंडिजकडून सिमन्सनं 45 चेंडूत 67 धावांची खेळी केली. तर एविन लुईसने 35 चेंडूत 40 धावा केल्या. तीन सामन्यांच्या या मालिकेत वेस्ट इंडिजने 1-1 ने बरोबरी केली आहे.

भारताकडून शिवम दुबेने 54 आणि ऋषभ पंत याने 22 चेंडूत 33 धावा केल्या तर वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा यांनी 1-1 विकेट घेतल्या. दीपक चाहर या सामन्यातही सर्वात महागडा गोलंदाज ठरला.

महत्वाच्या घडामोडी –

“शिवसेनेनं हिंदुत्त्व विकून मुख्यमंत्रिपद घेतलंय”

नारायण राणेंसारख्या पनवतीमुळेच देवेंद्र फडणवीसांची गाडी रूळावरून घसरली- विनायक राऊत

शिवसेनेला ढोंगीपणाचा आजार जडलाय, गेट वेल सून- अमृता फडणवीस

दिल्लीत अनाज मंडी येथे भीषण आग; 43 जणांचा मृत्यू