Home देश “संसदेच्या उद्घाटन सोहळ्याला वादाची किनार लागली नसती तर…”

“संसदेच्या उद्घाटन सोहळ्याला वादाची किनार लागली नसती तर…”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

दिल्ली : नव्या संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी झाले. या समारंभात 19 विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्याची सुरुवात केली होती. त्यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटनाला विरोध केला. मात्र सरकारच्या समर्थनार्थ 25 पक्ष आले आहे. आता राज ठाकरे यांनी मनसेची भूमिका मांडली आहे.

आज देशाच्या नवीन संसदभवनाचं लोकार्पण झालं. संसदभवन हे देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ, त्याचं औचित्य आणि गांभीर्य नव्या वास्तूत पण टिकून राहू दे. ह्या सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली, ती लागली नसती तर बरं झालं असतं, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

ही बातमी पण वाचा : “सत्तेसाठी किती आले अन् गेले, पण आठवले भाजपासोबतच राहिले”

असो, ह्या वास्तूच्या निर्माणासाठी आणि ही वास्तू ज्या लोकशाहीचं प्रतीक आहे ती लोकशाही टिकवण्यासाठी आजपर्यंत झटलेल्या प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन. भारतीय लोकशाही चिरायू होवो, असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, या संदर्भात राज ठाकरेंनी ट्विट केलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

संसदेच्या नव्या उद्घाटन सोहळ्यावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

महाविकास आघाडीकडून कोरोनाकाळात 25 कोटींचा भ्रष्टाचार; मनसेचा आरोप

“आघाडीत पुन्हा आघाडी?; पुण्यानंतर आता कोल्हापूरात 2 जागांवर ठाकरे गटाचा दावा, राष्ट्रवादीच्या चिंतेत वाढ”