Home महाराष्ट्र “आघाडीत पुन्हा आघाडी?; पुण्यानंतर आता कोल्हापूरात 2 जागांवर ठाकरे गटाचा दावा, राष्ट्रवादीच्या...

“आघाडीत पुन्हा आघाडी?; पुण्यानंतर आता कोल्हापूरात 2 जागांवर ठाकरे गटाचा दावा, राष्ट्रवादीच्या चिंतेत वाढ”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूर : जागावाटपावरून महाविकास आघाडीत पुन्हा बिघाड होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटानं कोल्हापूरच्या लोकसभेच्या दोन्ही जागावर दावा केला आहे.

खरंतर कोल्हापूरची जागा ही राष्ट्रवादीची आहे. पण, आता ठाकरे गटानं हातकंणंगलेसह, कोल्हापूर मतदारसंघावरही दावा केल्यानं, आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ही बातमी पण वाचा : शिंदे गटाचे ‘ते’ आमदार कधी अपात्र होणार?; विधासभा उपाध्यक्षांचं मोठं विधान, म्हणाले…

2019 ला हातकणंगलेतून धैर्यशील माने आणि कोल्हापूरातून संजय मंडलिक धनुष्यबणावर निवडून गेले होते. दोन्ही उमेदवार निवडून आल्यानं, कधी नव्हे ते शिवसेनेचे दोन खासदार कोल्हापूरला मिळाले होते. तसेच या दोन खासदारांमुळे शिवसेनेची ताकदही वाढल्याचं दिसत होतं. मात्र, एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर हे दोन्ही खासदार शिंदेंच्या शिनसेनेत गेले.

दरम्यान, असं असलं तरी कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघांवर ठाकरे गटानं दावा केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची चिंता वाढली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

भाजपला घराचा आहेत; आपल्याच सरकारच्या विरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक

राष्ट्रवादीला मोठा धक्का: गोंदियाच्या नगराध्यक्षांसह 15 नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

‘पाटील’ आडनावावरून उठलेल्या वादावर, आता गाैतमीनं पहिल्यांदाच सोडलं माैन, म्हणाली…