“मोठी बातमी! रोहिणी खडसे यांच्या गाडीवर अज्ञातांचा हल्ला, चालकासोबत शेतात पळ काढल्याने सुखरूप बचावल्या”

0
465

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला आहे.

हे ही वाचा : “माझ्यानंतर उद्धवला साथ द्या; विधानभवनात शेवटच्या भाषणात रामदास कदमांचा कंठ दाठला”

काल रात्रीच्या सुमारास रोहिणी खडसे यांच्या चारचाकी वाहनावर अज्ञातांनी दगडफेक केली, त्यानंतर रॉडने हल्ला करण्यात आला असून रोहिणी खडसे या हल्ल्यातून सुखरुप बचावल्या आहेत. मात्र या घटनेनंतर जळगावात सर्वत्र खळबळ उडाली आहे.

दरम्यान, रोहिणी खडसे एका कार्यक्रमातून मुक्ताईनगरकडे येत असताना सूतगिरणी परिसरात दोन दुचाकींवरुन आलेल्या चार अज्ञात इसमांनी त्यांच्या वाहनावर हल्ला केला. यावेळी वाहन चालकाने प्रसंगावधान दाखवत कार रस्त्यावरून बाजूला नेली. चालकाने रोहिणी खडसे यांच्यासह शेतात पलायन केलं यामुळे ते दोघेही सुखरूप बचावले.

महत्वाच्या घडामोडी –

मनसेचं खळखट्याक; नांदेड महानगरपालिकेवर केलं टाळे ठोको आंदोलन

“सांगलीत नऊ वर्षाच्या चिमुरडीने केला ब्रायडल मेकअप

“विधानसभेला अध्यक्ष मिळू नये ही भाजपची भूमिका”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here