Home नाशिक आदित्य ठाकरेंची, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका, म्हणाले…

आदित्य ठाकरेंची, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : आगामी महापालिका निवडणूकीसाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी जोरदार कंबर कसली असून पक्षबांधणीसाठी आदित्य ठाकरे राज्यभार दौरा करत आहेत.

आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी सभेला संभोदित करताना आदित्य ठाकरेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

हे ही वाचा : कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होणार का?; अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

मी नाशिकमध्ये येत-जात असतो. मागील अनेक वर्षांपासून मी या शहरात येतो. माझ्या आजोबांसोबत, वडिलांसोबत मी आलेलो आहे. नाशिक हे माझं आवडतं शहर आहे. नाशिक आणि कोल्हापूर ही दोन शहरं हिरवीगार राहिलेली आहेत. ही शहरं चांगली प्रगत, शांत आणि हिरवीगार राहिलेली आहेत. मात्र मला एक भीती वाटत आहे की, मागील 10 वर्षांमध्ये नाशिक शहर प्रगतीच्या बाबतीत कुठेतरी हरवलेले होते. अगोदर ब्ल्यू प्रिंट आली, ती कुठे गेली समजली नाही. नंतर नाशिक शहराला कोणीतरी दत्तक घेतलम. त्या योजनेचे काय झालं, अशी अप्रत्यक्ष टीका आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंवर केली.

महत्त्वाच्या घडामोडी –

कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं राज ठाकरेंनी केलं आवाहन

“वर्ष बाकी, दादांनी विचार करावा; देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना केली ‘ही’ मागणी

सत्यजित तांबे प्रकरणावर आता बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…