“नवाब मलिक हे कचरा किंग आहेत, त्यांच्यावर 100 कोटींचा दावा दाखल करणार”

0
384

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एनसीबीच्या कारवाईवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं आहे.  राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ड्रग्ज प्रकरणावरून भाजपवर जोरदार टीका केली होती. नवाब मलिक यांनी भाजप मुंबई शाखेचे माजी सरचिटणीस मोहीत कंबोज यांच्यावर ड्रग्ज प्रकरणावरून निशाणा साधला होता. यावरून आता मोहीत कंबोज यांनी पलटवार केला आहे.

नवाब मलिक हे कचरा किंग आहेत. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला मी कुठेही उत्तर देण्यास तयार असल्याचं कंबोज म्हणाले आहेत. तसेच नवाब मलिक यांच्यावर 100 कोटींचा दावा दाखल करणार असल्याचं देखील कंबोज यांनी म्हटलं.

दरम्यान, मोहित कंबोज यांच्या मेव्हण्याला सुद्धा 2 ऑक्टोबर रोजी कारवाई झालेल्या क्रूझवर पाहिलं गेलं होतं. मोहित कंबोज यांच्यावर नवाब मलिक यांनी टीका केल्यानं कंबोज यांनी नवाब मलिक यांच्यावर 100 कोटींचा दावा दाखल करणार असल्याचं कंबोज यांनी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“महाराष्ट्र बंदमध्ये शिवसेना संपूर्ण ताकदीनिशी उतरणार”

राज ठाकरेंची पुण्यात मोठी रणनीती; पुणे शहर अध्यक्षपदी माजी नगरसेविका वनिता वागस्कर यांची नियुक्ती

नारायण राणेंनी चक्क उद्धव ठाकरेंसाठी घातलं गाऱ्हाणं; म्हणाले…

“खोटं बोलणारी लोकं बाळासाहेबांना आवडत नव्हती, म्हणून अशा लोकांना त्यांनी पक्षातून काढलं”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here