प्रविण दरेकर, महिलांची माफी मागा अन्यथा…; रुपाली चाकणकरांचा इशारा

0
344

मुंबई : सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्यासह काही कलाकार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. 16 ऑक्टोबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते प्रवीण दरेकर यांची जीभ घसरली होती. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रविण दरेकरांवर टीका केली आहे.

प्रविण दरेकर, महिलांची माफी मागा अन्यथा आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो याची जाणीव ठेवा, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे, अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली होती.

महत्वाच्या घडामोडी –

‘सरकार नावाची व्यवस्था अस्तित्वात आहे का?’; चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

मंत्र्यांना टार्गेट करणं ही अतिशय चुकीची पद्धत, आमच्या नेत्यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचं काम- जयंत पाटील

राष्ट्रवादीवर टीका करताना प्रवीण दरेकरांची जीभ घसरली; म्हणाले…

नारायण राणेंनी अलिबाग पोलिसांसमोर लावली हजेरी; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here