Home महाराष्ट्र मंत्र्यांना टार्गेट करणं ही अतिशय चुकीची पद्धत, आमच्या नेत्यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचं...

मंत्र्यांना टार्गेट करणं ही अतिशय चुकीची पद्धत, आमच्या नेत्यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचं काम- जयंत पाटील

सांगली : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात आरोपांची मालिका चालूच ठेवली आहे. आधी 11 जणांवर आरोप केल्यानंतर सोमय्यांनी यामध्ये आता आणखी एका मंत्र्यांचं नाव घेतलं आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांनी 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मंत्र्यांवर धादांत खोटे आरोप करणं, मंत्र्यांना टार्गेट करणं ही अतिशय चुकीची पद्धत आहे. किरीट सोमय्या जाणीवपूर्वक आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचं काम करत आहेत. मुश्रीफ या घोटाळ्यात सहभागी असतील असं मला वाटत नाही, असा दावा जयंत पाटील यांनी यावेळी केला. ते सांगलीत बोलत होते.

दरम्यान, कुणीही आरोप केले तर त्याची चौकशी होतेच, चौकशी अडवू नये. सांगली मध्यवर्ती बँकेच्या चौकशीत काही निष्पन्न होईल असे मला वाटत नाही., असंही जयंत पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादीवर टीका करताना प्रवीण दरेकरांची जीभ घसरली; म्हणाले…

नारायण राणेंनी अलिबाग पोलिसांसमोर लावली हजेरी; म्हणाले…

मालमत्ता विकून देश चालवता येईल, अशी मोदी सरकारची मानसिकता- जयंत पाटील

माझं नाव घेतल्याशिवाय हसन मुश्रीफांना झोप लागत नाही; चंद्रकांत पाटलांचा टोला