…म्हणून कोरोना प्रवीण दरेकरांच्या जवळ गेला नसेल; अजित पवारांचा मिश्किली टोला

0
204

मुंबई : राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याच्या मुद्द्यावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अभिभाषणात चिंता व्यक्त केली होती. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली.

अजित पवारांनी यावेळी कोरोनाची सविस्तर आकडेवारी आणि राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यासोबतच भाजप नेते प्रवीण दरेकरांना त्यांच्या जॅकेटमुळेच कोरोना झाला नसेल, असा टोलाही अजित पवारांनी यावेळी लगावला.

दरम्यान, एका गोष्टीचं मला विशेष वाटतं की मुख्यमंत्र्यांना, प्रवीण दरेकरांना आणि सभापती महोदयांना कोरोना नाही झाला. विधानसभेमधील मला झाला, फडणवीसांनाही झाला. तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे तुम्हाला झाला नसेल किंवा प्रवीण दरेकरांचं जाकिट बघून तो जवळ गेलाच नसेल, म्हटला असेल कुठं जॅकेटातून आत शिरायचं. पण तुम्हा तिघांनाही कोरोना होऊ नये अशा आमच्या नेहमीच शुभेच्छा असतील. नाहीतर उद्या कोरोना झाला तर म्हणतील तुझीच दृष्ट लागली अन् कोरोना झाला, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

“सांगलीत ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडणुकीत वाद, भाजप कार्यकर्त्याकडून शिवसेना सदस्याची हत्या”

“मी पूजाला फक्त उचलून रिक्षात ठेवलं; मोबाईल, लॅपटॉपशी माझा काही संबंध नाही”

शिवसेनेनं बंगालच्या निवडणुकीत उतरावं त्यांना त्यांची औकात कळेल- राम कदम

“उद्धवजी हे महाराष्ट्राचे राहुल गांधी झाले आहेत”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here