‘Don 3’ चं निमित्त की ‘बडे साहब’चा ऑर्डर? रणवीर सिंहवर बॉलिवूडने का घातली बंदी?

0
65

‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ सारख्या चित्रपटांनंतर अभिनेता Ranveer Singh पुन्हा मोठ्या चर्चेत आला आहे. या चित्रपटांमधून दाऊद इब्राहिम आणि पाकिस्तानच्या कथित संबंधांवर भाष्य करण्यात आल्याने काही शक्तींना ते खटकले असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. त्यानंतर अचानक ‘Don 3’ वाद पुढे येत रणवीरविरोधात FWICE कडून नॉन-कोऑपरेशन डायरेक्टिव्ह जारी करण्यात आल्याने अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

विशेष म्हणजे, याआधीही अनेक मोठ्या कलाकारांनी चित्रपट सोडले किंवा प्रोजेक्टमधून माघार घेतली होती. मात्र त्यांच्याविरोधात अशा प्रकारची कठोर भूमिका क्वचितच पाहायला मिळाली. त्यामुळे रणवीर सिंहविरोधातील कारवाईमागे नेमके काय कारण आहे, याबाबत आता विविध चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर आणखी एक मोठी चर्चा समोर येत आहे. ‘धुरंधर’ चित्रपटांमध्ये अंडरवर्ल्ड आणि पाकिस्तान संदर्भातील मुद्दे दाखवल्यानंतर अंडरवर्ल्डमधून काही दिग्दर्शक आणि निर्मात्यांना कथित इशारे देण्यात आल्याची चर्चा रंगत आहे. त्याच दबावातून काही मंडळी रणवीरविरोधात भूमिका घेत असल्याचेही बोलले जात आहे. मात्र या सर्व दाव्यांना कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.

सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी रणवीरच्या समर्थनार्थ पोस्ट करत “हा फक्त ‘Don 3’ वाद नाही, तर टार्गेटिंग आहे,” असा दावा केला आहे. त्यामुळे आता हा वाद केवळ चित्रपटापुरता मर्यादित न राहता बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड चर्चेपर्यंत पोहोचला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here