…तर त्यांची राजकीय दुकानं बंद होतील; एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

0
276

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अयोध्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रामलल्लांचं दर्शन घेतलं. यानंतर पत्रकार परिषद घेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटावर हल्लाबोल केला.

काही लोकांना आमच्या या अयोध्या दौऱ्याची अ‍ॅलर्जी होती, अनेकांना या दौऱ्यामुळे त्रासही झाला. कारण त्यांना हिंदुत्वाची अ‍ॅलर्जी आहे. हे लोक हिंदू धर्माबद्दल चुकीचा प्रचार करत होते. त्यांना वाटतं की, हिंदूत्व जर लोकांच्या मनामनात पोहोचलं तर त्यांची राजकीय दुकानं बंद होतील. या भितीपोटी ते हिंदुत्वाला विरोध करत असतात, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

ही बातमी पण वाचा : ठाकरे गटात लवकरच भूकंप; ‘हा’ मोठा नेता मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात; शिवसेना नेत्याचा दावा

दरम्यान, तुम्ही नुकतेच डॉक्टर झाला आहात मग आता तुम्ही हिंदुत्वाची अ‍ॅलर्जी असणाऱ्या लोकांवर उपचार कसे करणार आहात? असा प्रश्न एका माध्यम प्रतिनिधीने एकनाथ शिंदे यांना केला. त्यावर डॉक्टरकीच्या डिग्रीचं सोडा, मी आधीपासूनचं डॉक्टर होतो, म्हणून मी एवढं मोठं ऑपरेशन केलंय आणि या लोकांना ऑपरेशनची गरज नाही, छोट्या-मोठ्या गोळ्यांनी यांचं काम होतं, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

महत्त्वाच्या घडामोडी 

उत्तर प्रदेशमध्ये दाखल होताच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी, उद्धव ठाकरेंना डिवचलं, म्हणाले…

“चेन्नई एक्सप्रेस सुसाट! रहाणेच्या वादळी खेळीमुळे, चेन्नईचा मुंबईवर 7 विकेट्सने दणदणीत विजय”

“काँग्रेसला धक्यावर धक्के, आता ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here