Home क्रीडा “गुजरातमध्ये KKR च्या रिंकू सिंगचं वादळ, शेवटच्या ओव्हरमध्ये सलग 5 षटकार ठोकत,...

“गुजरातमध्ये KKR च्या रिंकू सिंगचं वादळ, शेवटच्या ओव्हरमध्ये सलग 5 षटकार ठोकत, सामना गुजरातच्या हातातून हिसकावून घेतला”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अहमदाबाद : 16 व्या हंगामाला सूरूवात झाली असून आजचा सामना गुजरात टायटन्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात कोलकाताने गुजरातचा 3 विकेट्सने पराभव केला.

या सामन्यात गुजरातने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 4 विकेट गमावत 204 धावा केल्या. गुजरातकडून विजय शंकरने 24 चेंडूत 63 धावांची नाबाद विस्फोटक खेळी केली. विजयच्या या खेळीत 4 चाैकार, 5 षटकारांचा समावेश होता. तर साई सुदर्शनने 38 चेंडूत 53 धावांची खेळी केली. साईच्या या खेळीत 3 चाैकार, तप 2 षटकरांचा समावेश होता. पहिल्या 10 षटकात गुजरातने केवळ 88 धावा केल्या होत्या. मात्र शेवटच्या काही षटकांमध्ये विजय शंकरने तुफानी फलंदाजी करत गुजरातला 200 चा पल्ला पार करून दिला. तर कोलकाताकडून सुनील नारायणने 3, तर सुयश शर्माने  1 विकेट गमावली.

ही बातमी वाचा : …तर त्यांची राजकीय दुकानं बंद होतील; एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

दरम्यान, धावांचा पाठलाग करताना कोलकाताने हे लक्ष्य शेवटच्या ओव्हरमध्ये, शेवट्या चेंडूवर पूर्ण केलं. शेवटच्या षटकात 29 धावांची आवश्यकता होती. पहिल्या चेंडूवर उमेश यादवने 1 धाव घेत रिंकू सिंगला स्ट्राईत दिली. नंतर, रिंकु सिंगने दुसऱ्या, तिसऱ्या, चाैथ्या, पाचव्या, सहाव्या अशा सलग चेंडूंवर 5 षटकार ठोकत कोलकाताला विजय मिळवून दिला.

महत्त्वाच्या घडामोडी 

ठाकरे गटात लवकरच भूकंप; ‘हा’ मोठा नेता मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात; शिवसेना नेत्याचा दावा

उत्तर प्रदेशमध्ये दाखल होताच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी, उद्धव ठाकरेंना डिवचलं, म्हणाले…

“चेन्नई एक्सप्रेस सुसाट! रहाणेच्या वादळी खेळीमुळे, चेन्नईचा मुंबईवर 7 विकेट्सने दणदणीत विजय”