हिंमत असेल तर चित्रा वाघ यांनी नार्को टेस्टला सामोरं यावं, मी ही तयार आहे; मेहबूब शेख यांचं आवाहन

0
332

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अमरावती : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर काही दिवसांपूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलं आहे.

कारण आता कथित पीडीत महिलेनं चित्रा वाघ यांच्यावरच आरोप केला आहे. चित्रा वाघ आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी आपल्याला शेख यांच्याविरोधात तक्रार द्यायला भाग पाडले, अशी तक्रार या तरुणीने पोलिसात दाखल केली आहे.  यावरून आता मेहबूब शेख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही  वाचा : “जळगावमध्ये शिवसेनेचं वर्चस्व; स्वीकृत नगरसेवकपदी शिवसेनेचा उमेदवार बिनविरोध”

चित्रा वाघ या मुलींवर दबाव टाकून खोटं बोलून घेतात, हिंमत असेल तर चित्रा वाघ यांनी नार्को टेस्टला सामोरं यावं, मी ही तयार आहे. चित्रा वाघ यांचा भंपकपणा , मला आता पाठ झाला आहे., अशी जोरदार टीका मेहबूब शेख यांनी यावेळी चित्रा वाघ यांच्यावर केली. ते अमरावतीत माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, या प्रकरणात अनेक गोष्टी गंभीर आहेत. त्या मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. तिला जीवे मारायचं आणि तो आरोप मेहबूब शेखवर लावायचा, त्याला अटक करायची, असा त्यांचा कट होता.  मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे की, माझी नार्को टेस्ट करा, हे सर्व खोटं आहे. शेवटी सत्याचा विजय झाला., असं मेहबूब शेख म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी – 

सांगलीत मनविसेचा धुमधडाका; शेकडो तरुणांंचा आज मनसे विद्यार्थी सेनेत जाहीर प्रवेश

आगामी विधानसभा निवडणुकीत कोणाची विकेट पडणार?; भाजप की महाविकास आघाडी?; चंद्रकांत पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले…

“मेहबूब शेख बलात्कार प्रकरणाला वेगळं वळण; पिडीतेची चित्रा वाघ यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here