2014 चे खरे मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडेच होते, मात्र दुर्देवानं…; रोहित पवारांचा फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला

0
321

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत एक वक्तव्य करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

2014 चे खरे मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे होते, दुर्देवानं तसं झालं नाही, असा दावा रोहित पवारांना यावेळी केला. स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या 8 व्या स्मृतीदिनानिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये कार्यक्रमाचं आयोेजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.

हे ही वाचा : अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

2014 चे खरे मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे होते, मात्र दुर्देवानं त्यावेळी तसं झालं आहे. गोपीनाथ मुंडे आज असते, तर राजकारणाची पातळी इतकी खाली गेली नसती. विरोधक म्हणून विरोध झाला असता. मात्र पातळी खाली गेली नसती, ते असते तर राजकारणाची पातळी वर असती, असं म्हणत रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांवर अप्रत्यक्ष टीका केली.

महत्वाच्या घडामोडी –

“आगामी निवडणूकीपूर्वी भाजपला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यानं केला काँग्रेसमध्ये प्रवेश”

राज ठाकरेंचा पत्राद्वारे महाराष्ट्र सैनिकांना आदेश; म्हणाले, आपल्याला भोंग्याचा प्रश्न आता…

राज्यात जर कडक निर्बंध नको असतील, तर…; टास्क फोर्सच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ‘हा’ इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here