निवडणूकीच्या वेळी तुमचा बाप वेगळा होता, आता तो बदलला; बच्चू कडूंचा राणा दाम्पत्यावर हल्लाबोल

0
596

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा उकरून काढल्यानंतर, राज्यातल्या राजकारणातील वातावरन तापलं आहे. अशातच या वादात आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी उडी मारली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या मातोश्रीबाहेर आपण हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं राणा दाम्पत्यांनी गुरुवारी जाहीर केलं होतं. त्यासाठी शुक्रवारी ते मुंबईत दाखल देखील झाले आणि उद्या सकाळी 9 वाजता कसल्याही परिस्थितीत आपण मातोश्री बाहेर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं राणा दाम्पत्यांनी म्हटलं आहे. यावरून आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : मातोश्रीकडे येण्याची कोणी हिंमत करणार नाही, तुम्ही आता घरी जा; उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना सूचना

निवडणूकीच्या वेळी तुमचा बाप वेगळा होता आणि तुमचा बाप बदलला आहे, अशी जोरदार प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी यावेळी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन राणा निवडून आले आहेत. रवी राणा आणि नवनीत राणा विकासाचा मुद्दा सोडत आहेत. प्रहार संघटना शिवसेनेसोबत आहे, आम्ही शिवसैनिकांसोबत आहोत. रवी राणा यांची तेवढी उंची नाही, ते मातोश्रीवर जाणार नाहीत, असा टोला बच्चू कडूंनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

उद्या वाजता हनुमान चालिसा वाचण्यासाठी मातोश्रीवर जाणारच; राणा दाम्पत्याचा निर्धार

‘….म्हणून मी महाविकास आघाडीतून बाहेर पडलो’; राजू शेट्टींचा खुलासा

मनसेकडून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न; शिवाजी पार्कमध्ये मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यासमोर केली बॅनरबाजी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here