“काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादीला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यानं समर्थकांसह केला काँग्रेसमध्ये प्रवेश”

0
697

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता काँग्रेस पक्षानं राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे.

राष्ट्रवादीचे माजी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश बोबडे यांनी समर्थकांसह काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत सोलापूर येथे हा पक्षप्रवेश पार पडला. तसेच काँग्रेस पक्षाच्या विजय संकल्प मेळाव्यात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

हे ही वाचा : देवेंद्र फडणवीसांच्या नोटीसीविरोधातील आंदोलन भोवलं; भाजपच्या ‘या’ आमदारांसह 23 जणांवर गुन्हे दाखल,

दरम्यान, दोनच महिन्यांपूर्वी ऋषिकेश बोबडे यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ते कोणत्या पक्षात जाणार, याकडे त्यांच्या समर्थकांचं लक्ष लागून राहिलं होतं. मात्र त्यांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं सर्व प्रश्नांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

15 दिवसात बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडा, अन्यथा आम्ही पाडू; मुंबई महापालिकेकडून राणेंना तिसरी नोटीस

हिंदुत्वासोबतच मराठी माणसाची मनसे पुन्हा दिसली पाहिजे; राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

“एक नोटीस काय आली अन् जळफळाट सुरु, तुम्ही नाथाभाऊंची पिळवणूक केली नाही का?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here