आम्ही सगळेच आशावादी होतो की…; खडसेंच्या राजीनाम्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

0
160

मुंबई : भाजपचे जेष्ठ्य नेते एकनाथ खडसे यांचं राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब झाला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काही वेळापूर्वीच एकनाथ खडसे यांचा भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष या नात्याने माझ्यापर्यंत पोहोचला. त्यांचा राजीनामा हातात पडेपर्यंत मी आणि आम्ही सगळेच आशावादी होतो की, कितीही रागावले तरी खडसे हा निर्णय घेणार नाहीत. ते आमच्याशी बोलतील आणि यातून मार्ग काढून आम्ही पुढे जाऊ, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, शेवटी कोणतीही गोष्ट जी ठरलेली असते, ती आपण टाळू शकत नाही. त्यामुळे हे कटू सत्य आहे की, खडसेंनी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

ज्या पक्षाने छळलं त्याच पक्षात नाथाभाऊंनी जाणं हे दुर्दैवी- रावसाहेब दानवे

ओहोटी संपली आता भरती येणार, खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर रोहित पवारांची प्रतिक्रिया

फडणवीसांचं राजकारण इतकं खुनशी असेल वाटलं नव्हतं; खडसेंच्या राजीनाम्यानंतर ‘राष्ट्रवादीची टीका

“एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत किंमत मिळणार नाही, त्यांना पश्चाताप होईल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here