संजय राऊत माझे मित्र, त्यांनी मानहानीची किंमत वाढवावी; चंद्रकांत पाटलांचा टोला

0
254

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दैनिक ‘सामना’ला पत्रं पाठवून शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप केले आहेत. यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया देत चंद्रकात पाटलांवर सव्वा रूपयांचा दावा करणार असल्याचं म्हटलं. यावरून आता चंद्रकांत पाटलांनी पलटवार केला आहे.

संजय राऊतांनी माझ्यावर सव्वा रुपयांची मानाहानी करणार असल्याचं मी ऐकलं आहे. ते माझे मित्रं आहेत. त्यामुळे त्यांना मी एकच सूचवेन. त्यांनी मानहानीची किंमत थोडी वाढवावी. कारण राऊतांची मानहानी निश्चितच सव्वा रुपयांची नाही, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला. ते माध्यमांशी बोलत होते.

हरकत नाही. कोणी 100 कोटी आणि 50 कोटीचे दावे करत आहेत. आता हे सव्वा रुपयाचा दावा करत आहेत. संजय राऊत माझे मित्रं असल्याने मी त्यांना सूचवेन की किंमत थोडी वाढवावी लागेल. कारण शेवटी मानहानीचा दावा म्हणजे काय? माझी मानहानी झाली ती मानहानी एवढ्या कोटीची आहे, असा मानहानीचा अर्थ होतो. राऊतांची मानहानी सव्वा रुपयांची नाही. त्यांनी ती मानहानी वाढवावी, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

कितीही तोडफोड करा, मुंबई महापालिकेत भाजपला मोठे यश मिळणार- देवेंद्र फडणवीस

“सोमय्यांनी मुश्रीफांची चिंता वाढविली, पुन्हा कोल्हापूरला जाणार”

संजय राऊतांनी मेंदू निकामी झाल्यासारखे वक्तव्ये करू नये- अतुल भातखळकर

मुख्यमंत्र्यांनी पाठवलेलं पत्र म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैवं; चित्रा वाघ संतापल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here