Home महाराष्ट्र “सोमय्यांनी मुश्रीफांची चिंता वाढविली, पुन्हा कोल्हापूरला जाणार”

“सोमय्यांनी मुश्रीफांची चिंता वाढविली, पुन्हा कोल्हापूरला जाणार”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची माहिती घेण्यासाठी कोल्हापूरला जात असताना भाजप नेते किरीट सोमय्या यांना कराड येथे पोलिसांनी अडवलं व त्यांना परत मुंबईला पाठवण्यात आलं. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण शांत झालेलं असतानाच सोमय्यांनी आता कोल्हापूरला जाण्याचा निर्धार केला आहे.

आपण 27 सप्टेंबरला कोल्हापूरला जाणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी म्हटलं. सोमय्यांनी कोल्हापूरच्या पोलीस अधिक्षकांना पत्र लिहून त्यांच्या मागील 20 सप्टेंबरच्या कोल्हापूर दौऱ्या दरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईची कागल पोलिसांत तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे. किरीट सोमय्यांनी पोलीस अधिक्षकांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, मी सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना घोटाळा, गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना घोटाळा आणि हसन मुश्रीफ यांच्या परिवाराचा घोटाळा या संदर्भात कोल्हापूरला जायचं आहे., असं सोमय्यांनी पत्रात म्हटलं आहे.

माझ्यावर कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करण्याच्या बंदीचा आदेश 20 सप्टेंबरला काढण्यात आला आहे. मी आता 27 सप्टेंबरला रात्री मुंबईहून निघून 28 सप्टेंबरला कोल्हापूरला येणार आहे. माझे पूर्वी दिलेल्या माहितीप्रमाणे सर्व कार्यक्रम होणार आहेत. 28 सप्टेंबरला सकाळी 9 वाजता महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर दर्शन आणि आशीर्वाद घ्यायची इच्छा आहे, माझी योग्य सोय करावी, अशी विनंती सोमय्यांनी या पत्रात केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

संजय राऊतांनी मेंदू निकामी झाल्यासारखे वक्तव्ये करू नये- अतुल भातखळकर

मुख्यमंत्र्यांनी पाठवलेलं पत्र म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैवं; चित्रा वाघ संतापल्या

उलट सुलट आरोप करण्यापेक्ष राज्याच्या विकासाकडे लक्ष द्या- रामदास आठवले

खोकला आला तरी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येते; खासदार उदयनराजे भोसलेंचं अजब विधान