Home महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांनी पाठवलेलं पत्र म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैवं; चित्रा वाघ संतापल्या

मुख्यमंत्र्यांनी पाठवलेलं पत्र म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैवं; चित्रा वाघ संतापल्या

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. तर उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहून प्रत्युत्तर दिले आहे. त्यांच्या या पत्राचा भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

चित्रा वाघ यांनी मंत्रालयासमोर मुख्यमंत्र्यांच्या पत्राची प्रत जाळत जाहीर निषेध केला. मुख्यमंत्र्यांचे हे पत्र म्हणजे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याची टीका त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या पत्राला दिलेलं उत्तर म्हणजे अत्याचारपिडीत महिलांच्या वेदनेची थट्टा उडवणे आहे. तुमच्या नाकाखाली राज्यातील महिला मुलींवर अत्याचार सुरू आहेत देशातील प्रत्येक होणाऱ्या घटना वाईटच… आम्हाला त्याची संवेदना आहेच, पण आम्ही महाराष्ट्रात होणाऱ्या प्रत्येक घटनेवर तुम्हाला प्रश्न विचारणारचं व तुम्हाला त्याची उत्तर द्यावी लागतील. आपले आजचे पत्र म्हणजे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

उलट सुलट आरोप करण्यापेक्ष राज्याच्या विकासाकडे लक्ष द्या- रामदास आठवले

खोकला आला तरी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येते; खासदार उदयनराजे भोसलेंचं अजब विधान

संजय राऊतांनी स्वत:ची किंमत ओळखली; निलेश राणेंचा घणाघात

“पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेला मोठा धक्का, असंख्य शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश”