राष्ट्रवादीवर टीका करताना प्रवीण दरेकरांची जीभ घसरली; म्हणाले…

0
4

पुणे : सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि ‘शांताबाई फेम’ गायक संजय लोंढे यांच्यासह काही कलाकार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. 16 ऑक्टोबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते प्रवीण दरेकर यांची जीभ घसरली.

राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे, अशी टीका प्रवीण दरेकरांनी यावेळी केली. दरेकरांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शिरूर येथे राजे उमाजी नाईक यांच्या 230 व्या जयंती निमित्त जय मल्हार क्रांती संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला दरेकर उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

महत्वाच्या घडामोडी –

नारायण राणेंनी अलिबाग पोलिसांसमोर लावली हजेरी; म्हणाले…

मालमत्ता विकून देश चालवता येईल, अशी मोदी सरकारची मानसिकता- जयंत पाटील

माझं नाव घेतल्याशिवाय हसन मुश्रीफांना झोप लागत नाही; चंद्रकांत पाटलांचा टोला

साकीनाका बलात्कार प्रकरण! पीडितेच्या मुलांना वाऱ्यावर सोडणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here