‘हे’ पातळी घसरल्याचं लक्षण; कंगना प्रकरणावरून अमृता फडणवीसांची शिवसेनेवर टिका

0
3

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर सर्वच स्तरावरुन तिच्यावर टीकास्त्र करण्यात येत आहे. मुंबईच्या दिंडोशी भागात शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी कंगना रणौतच्या पुतळ्याला चपलांनी चोप देत आपला निषेध व्यक्त केला. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आपल्याला एखाद्याचं म्हणणं पटू शकत नाही, पण लोकशाहीत व्यक्त होण्याचा आणि आपलं मत मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे. वाद-प्रतिवाद होत रहावेत, पण पोस्टरला चपलांनी मारण हे पातळी घसरल्याचं लक्षण आहे, असं म्हणत अमृता फडणवीसांनी शिवसेनेवर टिका केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र कुणाच्या बापाचा नाही. जे करायचंय ते करा, असं ट्विट करत कंगना रणौतने शिवसेनेला उत्तर दिलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण

अमित ठाकरे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; केली ‘ही’ महत्वाची विनंती

महाराष्ट्र कुणाच्या बापाचा नाही, जे करायचंय ते करा- कंगणा रणाैत

कंगनाला RPI संरक्षण देईल, शिवसेनेनं धमकी देणं योग्य नाही – रामदास आठवले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here