Home महाराष्ट्र अमित ठाकरे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; केली ‘ही’ महत्वाची विनंती

अमित ठाकरे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; केली ‘ही’ महत्वाची विनंती

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. अजूनही ती सुरु करण्यात आलेली नाही. मात्र गंभीर आजाराच्या रूग्णांना रेल्वे प्रवासासाठी परवानगी द्यावी, अशा विनंतीचे पत्र मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.

गेल्या सहा महिन्यात लॉकडाऊन असल्याने अनेक आजाराने ग्रस्त असलेल्या रूग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच या आजारांच्या उपचारांचा खर्च लाखांच्या घरात असतो. यासोबतच त्यांना प्रवासाला देखील खर्च करावा लागतोय. त्यामुळे अशा सर्वसामान्य रूग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना खाजगी वाहतूक परवडणार नसल्याने त्यांना रेल्वे प्रवास करण्याची मुभा द्यावी, असं अमित ठाकरे यांनी पत्रात नमूद केलं आहे.

दरम्यान, मनसेच्या या मागणीचा राज्य सरकारने तसंच रेल्वे प्रशासनाने विचार करावा, असंही अमित ठाकरे यांनी या पत्रात म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

महाराष्ट्र कुणाच्या बापाचा नाही, जे करायचंय ते करा- कंगणा रणाैत

कंगनाला RPI संरक्षण देईल, शिवसेनेनं धमकी देणं योग्य नाही – रामदास आठवले

…तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत; ‘या’ शिवसेना आमदाराचा कंगणा रणाैतला इशारा

शिवसेना महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्याशिवाय राहाणार नाही; संजय राऊतांचं भाजप खासदाराला प्रत्युत्तर