माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला गेले, फडणवीसांच्या दाव्यावर, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

0
434

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू आणि भाजप नेते रवी राणा यांच्यातील वाद आता टोकाला गेला आहे. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मत मांडलं आहे.

माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला गेले, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. यावरून आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : “राज ठाकरेंचा मास्टर प्लॅन; पुण्यात आता तब्बल ‘इतके’ राजदूत नेमणार”

देवेंद्र फडणवीस यांचे विधान बोलकं असून याचा गंभीर विचार करायला हवा, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी यावेळी दिली. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

बच्चू कडू कडू पैसे घेऊन गुवाहाटीला गेले नसून ते माझ्या एका फोनकॉलवर गुवाहाटीला गेले होते, असं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं. मात्र, त्यापुढे जाऊन त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलं, ‘इतरांनी घेतलं का हे मला माहिती नाही’, असं ते म्हणाले. ही खूप बोलकी वाक्य आहेत. याचा आपण सर्वांनीच गंभीरपणे विचार करायला हवा, अशी टीका आदित्य ठाकरेंनी यावेळी केली.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“…तर राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार येणार?”

शिंदे- फडणवीस सरकारमधील अनेक आमदार माझ्या संपर्कात; नाना पटोलेंच्या दाव्याने खळबळ

खोक्यांवरून आता रामदास आठवलेंची भन्नाट कविता, म्हणाले, ज्यांनी घेतलेत खोके, त्यांचे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here