अबब..! अंत्यसंस्कार केलेली व्यक्ती घरी परतली; कुटुंबियांची झोपच उडाली

0
249

राजस्थानमधील राजसमंद येथे एका कुटुंबाने परिवारातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार केले होते. मात्र १० दिवसांनी ती व्यक्ती घरी पुन्हा परतली. यामुळे सर्वांना धक्का बसला.

ओमकारलाल गाडोलिया असं या व्यक्तिचं नाव असून 11 मे रोजी तो व्यक्ती आपल्या कुटूंबाला न सांगता उदयपूरला गेला होता. यकृताच्या काही आजारामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो राजस्थानमधील आरके रुग्णालयाने उपचार घेत होता.

रुग्णालयाने ओमकारलाल गाडोलिया या व्यक्तीच्या मृतदेह असल्याचं सांगत नातेवाईकांनी गोवर्धन प्रजापत नावाच्या व्यक्तीचा मृतदेह दिला होता. यानंतर गाडोलियाच्या कुटुंबियांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. मात्र 10 दिवसांनी ओमकारलाल घरी परतला. त्याने दिलेल्या माहितीनंतर हे प्रकरण समोर आलं आहे.

गाडोलिया कुटुंबाने त्या मृतदेहावर 15 मे रोजी अंत्यसंस्कार केले. परंतु,23 मे रोजी ओमकारलाल घरी परत आला आणि त्याचा मृत्यू झाल्याचे समजल्यावर त्याला धक्का बसला.

दरम्यान, पोलिसांना तपास सुरू केला आणि कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार केलेला मृतदेहाबद्दल माहिती मिळवली.

महत्वाच्या घडामोडी –

“महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपर किंग्सला गुडबाय?”

“नष्ट झालेल्या घरांसाठी दीड लाख, झोपडपट्ट्यांसाठी 15 हजार; ताैत्के चक्रीवादळग्रस्तांसाठी मदत जाहीर”

महाविकास आघाडीचे सरकार पडणार ही खरंच अफवा असेल तर…; नितेश राणेंचा हल्लाबोल

1 जूननंतर लाॅकडाऊन टप्प्या टप्प्यानं उठविणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here