“तुमच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का या जन्मीतरी पुसला जाणार नाही”

0
277

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवाजी पार्कवरील ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे  यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागली.

मंत्रीपदं तुमच्या बुडाला चिकटलेली असली, तरी ती काही काळापुरती आहेत. पण कपाळावरचा गद्दारीचा शिक्का या जन्मीतरी पुसला जाणार नाही. तेव्हा अनेकांना प्रश्न पडला की आता शिवसेनेचं काय होणार? माझ्या मनात चिंता नव्हती. आज हे शिवतीर्थ बघितल्यावर त्यांच्या मनात पुन्हा प्रश्न पडला की अरे बापरे, गद्दारांचं कसं होणार? इथे एकही माणूस भाड्याने आणलेला नाही. तासाची बोली लावून आणलेला नाही, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.

हे ही वाचा : ही तर बाप चोरणारी औलाद; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

दरम्यान, वाईट आणि संताप एका गोष्टीचा वाटतो. जेव्हा मी माझ्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात होतो, माझी बोटेही हलत नव्हती, शरीर निश्चल पडले होते, त्यावेळी मी ज्यांच्यावर जबाबदारी दिली होती, ते कटाप्पा.. म्हणजे कट करणारे अप्पा तेच कट करत होते. उद्धव ठाकरे पुन्हा उभा राहूच शकणार नाह,असे त्यांना वाटत होते. मात्र, त्यांना कल्पना नाही की हा उद्धव ठाकरे नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. तुम्ही आई जगदंबेच्या शक्तीशी पंगा घेतला आहे. देव तुमचे भले करो, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

आजचा रावण हा पन्नास खोक्यांचा; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा

शिवसेनाप्रमुख व्हायची लायकी आहे का?; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

“दसरा मेळाव्याच्या आधीच राडा; नाशिक महामार्गावर महिला शिवसैनिकांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना दिला चोप”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here