मुंबई : गणेशोत्सवामध्ये कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना दहा दिवसाचा क्वारंटाईन आणि मुंबईत परतण्यासाठी 14 दिवसाचा क्वारंटाईन करण्याचा नियम राज्य सरकारने लागू केला आहे. यावरुन भाजप नेते निलेश राणेंनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय.
ह्या सरकारचं डोकं सरकलय की काय?, असं म्हणत निलेश राणेंनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. दरम्यान यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलं आहे.
एकीकडे राज्य सरकार कोकणात जाणाऱ्यांना दहा दिवसाचा क्वारंटाईन नियम लागू केला आहे आणि दुसरीकडे त्याच चाकरमान्यांना मुंबईत परतण्यासाठी 14 दिवसाचा क्वारंटाईन नियम लावत आहे. ह्या सरकारचं डोकं सरकलय की काय?, असं निलेश राणे म्हणाले.
एकीकडे राज्य सरकार कोकणात जाणाऱ्यांना दहा दिवसाचा क्वारंटाईन नियम लागू केला आहे आणि दुसरीकडे त्याच चाकरमान्यांना मुंबईत परतण्यासाठी 14 दिवसाचा क्वारंटाईन नियम लावत आहे. ह्या सरकारचं डोकं सरकलय की काय??
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 7, 2020
महत्वाच्या घडामोडी-
…मग सुशांत सिंग प्रकरणात तुम्हीच पुरावे दाबत आहात असं म्हणायचं का?; रोहित पवारांचा भाजपला सवाल
“मनसेच्या अविनाश जाधव यांना जामीन मंजूर”
भाजप महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक- सचिन सावंत