Home महाराष्ट्र पावसाचा जोर ओसरल्याने सांगलीत पुराचा धोका टळला; कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट

पावसाचा जोर ओसरल्याने सांगलीत पुराचा धोका टळला; कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट

सांगली : सांगली जिल्ह्याच्या कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर थोडा कमी झाल्याने सांगलीला निर्माण झालेला महापुराचा धोका तूर्त टळला आहे. कृष्णा नदी पात्रातील पाणीपातळी धिम्या गतीने कमी होत आहे.

नदीच्या पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. काल दुपारी 2 वाजता कृष्णा नदीची पाणी पातळी 23 फुटांवर पोहोचली होती. दिवसभरात केवळ 9 इंचाने पाणी पातळी कमी झाली आहे.

दरम्यान, सांगली जिल्ह्यातील नेहमी पूरबाधित होणाऱ्या गावांना नवीन यांत्रिक बोटी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या या 15 यांत्रिक बोटींचं कृष्णा नदीमध्ये प्रत्याक्षिक घेण्यात आलं आहे. महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या बंदरे आणि परीवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बोsटींची चाचणी घेतली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

ह्या सरकारचं डोकं सरकलय की काय?; निलेश राणेंची राज्य सरकारवर टीका

…मग सुशांत सिंग प्रकरणात तुम्हीच पुरावे दाबत आहात असं म्हणायचं का?; रोहित पवारांचा भाजपला सवाल

खासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी रोखण्यासाठी राज्यात भरारी पथके नेमण्याचे निर्देश- राजेश टोपे

“मनसेच्या अविनाश जाधव यांना जामीन मंजूर”