Home महाराष्ट्र “मनसेच्या अविनाश जाधव यांना जामीन मंजूर”

“मनसेच्या अविनाश जाधव यांना जामीन मंजूर”

ठाणे : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात तळोजा कारागृहात बंदिस्त असलेल्या मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना आज जामीन मंजूर झाला आहे.

ठाणे महापालिकेच्या कोविड रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या मुलींना काढल्याप्रकरणी मनसेकडून ठाणे महापालिकेसमोर आंदोलन सुरु होतं. हे आंदोलन करत असताना पोलिसांनी अविनाश जाधव यांना अटक केली होती. अविनाश जाधव यांच्यावर कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ठाणे पोलिसांनी कोर्टाकडून अधिक वेळ मागितला होता. तर अविनाश जाधव यांच्या वकिलांनी जामिनासाठी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूचे युक्तिवाद न्यायाधीश पी पी जाधव यांनी ऐकून घेतलं आणि त्यांना जामीन मंजूर केला.

दरम्यान, अविनाश जाधव यांना 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला असल्याचं मनसेचे वकील राजेंद्र शिरोडकर यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

भाजप महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक- सचिन सावंत

“जम्बो कोव्हिड सेंटरच्या पाहणीवेळी अजित पवारांची विचारणा”

परदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना धनंजय मुंडे यांचा दिलासा

चीनचा सामना करणं तर सोडूनच द्या, पण त्यांचं नाव घेण्याचं धाडसही नरेंद्र मोदींमध्ये नाही- राहुल गांधी