Home महाराष्ट्र खासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी रोखण्यासाठी राज्यात भरारी पथके नेमण्याचे निर्देश-...

खासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी रोखण्यासाठी राज्यात भरारी पथके नेमण्याचे निर्देश- राजेश टोपे

मुंबई : राज्यात कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून आणि रुग्णवाहिकांकडून वाजवी शुल्क आकारण्याबाबत राज्य शासनाने वेळोवेळी निर्देश दिले आहेत. यासर्व निर्देशांची अंमलबजावणीसाठी आणि तपासणीसाठी राज्यात भरारी पथक नेमण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना लागू करण्याचा निर्णय 23 मे रोजी घेण्यात आला असून 30 जून 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार खासगी वाहने आणि रुग्णवाहिका अधिग्रहीत करून त्यांचे कमाल दर निश्चित केले आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

दरम्यान, खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना बाधीत रुग्णांकडून जास्तीचे शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याची दखल घेऊन राज्याच्या जनतेच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांची प्रभावी आणि काटोकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी तसेच विभागीय आयुक्तांनी देखील त्यांच्या स्तरावर भरारी पथक नेमण्याचे निर्देश राजेश टोपे यांनी दिले आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

“मनसेच्या अविनाश जाधव यांना जामीन मंजूर”

भाजप महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक- सचिन सावंत

“जम्बो कोव्हिड सेंटरच्या पाहणीवेळी अजित पवारांची विचारणा”

परदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना धनंजय मुंडे यांचा दिलासा