मुंबई : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मेगाभरतीवरुन राज्यसरकारवर टीका केली होती. त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीसांना उत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य सरकारने मेगाभरती करणार नाही, अशी भूमिका मांडली होती, तेव्हा त्यांच्या मनाला वेदना झाल्या नाहीत का?, तेव्हा तर कोरोना नव्हता, असा सवाल करत अशोक चव्हाणांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.
देवेंद्र फडणवीस यांनी काल चुकीचं वक्तव्य केलं. सरकारने नोकरभरती बंद करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. आम्ही कोरोनामुळे भरती प्रक्रिया थांबवली आहे. हा जीआर काल काढलेला नाही, 4 मे रोजी काढला आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.
दरम्यान, 15 सप्टेंबर 2020 पर्यंत भरती न करण्याची राज्य सरकारची भूमिका मनाला वेदना देणारी असल्याचं म्हटलं होतं.
महत्वाच्या घडामोडी-
इच्छा असेल त्या मुंबईकराला कोरोना चाचणी करण्याची मुभा- आदित्य ठाकरे
मराठा आरक्षण हा राजकारणाचा विषय नाही- छत्रपती संभाजीराजे
… तरआम्ही शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार – चंद्रकांत पाटील