Home महाराष्ट्र इच्छा असेल त्या मुंबईकराला कोरोना चाचणी करण्याची मुभा- आदित्य ठाकरे

इच्छा असेल त्या मुंबईकराला कोरोना चाचणी करण्याची मुभा- आदित्य ठाकरे

मुंबई : राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांना इच्छा असेल त्याला कोरोना चाचणी करण्याची मुभा असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे आपल्याला कोरोना संसर्ग झाल्याची शंका असणाऱ्या प्रत्येक मुंबईकराला आपल्या शंकेचं समाधान करता येणार नाही.

आज मुंबईत कोरोनाच्या केवळ 700 रुग्णांची नोंद आहे. आज एकाच दिवसात सर्वाधिक 8 हजार 776 चाचण्या घेण्यात आल्या. चेस द व्हायरस मुंबई महानगर प्रदेशात राबवली जात आहे. तुमचे सुरक्षा गिअर्स खाली ठेवू नका. मास्क खाली उतरवू नका. आपला कोरोनाबाधितांची संख्या कमी करण्यावरच भर आहे. मागील काही आठवड्यापासून हे अभियान राबवण्यात येत आहे. लवकरच यांचे निकाल दिसतील, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

तसेच नागरिकांना आपल्या इच्छेप्रमाणे कोरोना चाचणीची मुभा देणारं मुंबई हे एकमेव शहर असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी-

मराठा आरक्षण हा राजकारणाचा विषय नाही- छत्रपती संभाजीराजे

… तरआम्ही शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार – चंद्रकांत पाटील

पोलिसांसाठी आनंदाची बातमी, सिडकोकडून पोलिसांसाठी ‘एवढ्या’ घरांची योजना; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

बोकडाच्या वाहतुकीवर आणि कुर्बानीसाठी कोणतीही बंदी असणार नाही- नवाब मलिक