‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री रूपाली भोसलेही कोरोना पाॅझिटिव्ह; सध्या झाली क्वारंटाईन”

0
419

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यात सध्या कोरोनानं डोकं वर काढलं असून अनेक नेते, अभिनेते, अभिनेत्रींना कोरोनाची बाधा झाली आहे. अशातचसध्या स्टार प्रवाहवर सुरू असलेली ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजनाची भूमिका साकारत असणारी फेम अभिनेत्री रूपाली भोसले हिला देखील कोरोनाची लागण झाली आहे.

रूपाली भोसले हिनं इन्स्टाग्राम अकाैंटवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. तसेच ती सध्या होम क्वारंटाईन झाली आहे.

सर्वतोपरी काळजी घेऊनही माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी सर्व नियमांचं पालन करत असून स्वतःला आयसोलेट केलं आहे. सध्या मी होम क्वारंटाईन आहे. मला खात्री आहे, मी लवकरच यातून बरी होईन. प्लीज सगळ्यांनी सुरक्षित राहा आणि मास्क घाला. प्रत्येकाने आपापली आणि इतरांची काळजी घ्या. मास्क लावायला विसरु नका, असं आवाहन रूपाली भोसले हिनं केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

राजाही वर्क फ्रॉम होम प्रजाही वर्क फ्रॉम होम; चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्र्यांवर टीका

आगामी मुंबई महापालिकेत शिवसेना कुणाला उमेद्वारी देणार?; आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

सरकारवर विश्वास ठेवा, तुमच्या सर्व मागण्या पूर्ण होतील, संप मागे घ्या; शरद पवारांचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here