“भाजपचा काँग्रेसला दणका; ‘हा’ मोठा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश?”

0
1064

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पणजी : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं आपली कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच भाजपने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.

हे ही वाचा : राष्ट्रवादीला हिसका दाखवण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेसचा स्वबळाचा नारा

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे मोठे नेते रवी नाईक हेही रविवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. रवी नाईक लवकरच आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असून ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

दरम्यान, भाजपकडून रवी नाईक यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच रवी नाईक यांच्या दोन्ही पुत्रांनी याअगोदरच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

भाजपचा महाविकास आघाडीला धक्का ; जिल्हा बॅंकेच्या संचालकाचा भाजपात प्रवेश

‘फडणवीसांना नाही तर चंद्रकांतदादांनाच सत्तेची घाई, अन्…’; जयंत पाटलांचा खोचक टोला

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला धक्का; भाजप नगरसेविका राष्ट्रवादीच्या वाटेकर? मात्र…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here