देवेंद्रजींच्या हातात काही बाॅम्ब असतील तर त्यांनी तो फोडावा- संजय राऊत

0
447

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यामध्ये काही दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच आता फडणवीसांनी म्हटलं की, ‘मी दिवाळीनंतर मलिक यांचे अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधातील पुरावे जाहीर करून बॉम्ब फोडणार आहे, असा इशारा फडणवीसांनी दिला आहे. यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : “आदित्य ठाकरेंकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम; फडणवीसांच्या नागपूरातील युवा मोर्चाचा ‘हा’ मोठा आता शिवसेनेत”

बॉम्ब लगेच फुटले पाहिजेत. नाहीतर ज्याच्या हातात आहेत, बॉम्ब त्यांच्या हातातच ते फुटतात. त्यामुळे हातात बॉम्ब वगैरे असतील तर ते डिस्पोज करा., असा टोला राऊतांनी फडणवीसांना यावेळी लगावला.

दरम्यान, कोणाकडे बॉम्ब असेल असं राजकीय नेते सांगत असतील तर ते स्वत:च्या जीवाशी खेळतायत. तसेच ताबडतोब त्यांनी एक तर बॉम्ब फेकला पाहिजे किंवा तो संपवला पाहिजे. देवेंद्रजींच्या हातात काही बॉम्ब असेल तर त्यांनी फोडावा ना दिवाळी संपायची कशाला वाट पहायची, असं राऊत यांनी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी – 

आम्ही नारायण राणेंसारख्यांना पुरून उरलो आहोत; गुलाबराव पाटलांचा हल्लाबोल

पुण्यात पुढची सत्ता राष्ट्रवादीचीच; ‘या’ आमदाराचा विश्वास

माणूस एकदम भला आहे, मात्र प्रॉब्लेम एकच कधीच खरं बोलत नाही; भातखळकराचा संजय राऊतांना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here