सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दूध दर मागणीसाठी 21 जुलै रोजी राज्यभर दूध बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. तर राजू शेट्टींच्या या दूध आंदोलनावरून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजु शेट्टी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ते सांगली मध्ये बोलत होते.
राजू शेट्टी यांचे आंदोलन म्हणजे, नाटक असून, हे दूध आंदोलन मॅच फिक्सिंग असल्याची टीका माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. तसेच बारामतीला आमदार होण्यासाठी जातात, पण दुधाच्या दरासाठी जाणे जमत नाही, असा टोलाही खोत यांनी राजू शेट्टींनी लगावला आहे.
दरम्यान, राजू शेट्टी बारामतीला आमदार होण्यासाठी जातात. पण दुधाच्या दरासाठी त्यांना जायला जमत नाही. शरद पवारांच्याकडे शेट्टी यांनी दुधाच्या योग्य दराची का मागणी केली नाही, एकीकडे सरकारमध्ये राहायचे आणि दुसरीकडे सरकार विरोधात आंदोलनचे नाटक करायचा उद्योग शेट्टी करत आहेत, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी शेट्टी याचे दूध आंदोलन सुरु होण्याआधीच त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; म्हणाले…
सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन- जयंत पाटील
उद्धव ठाकरे राम मंदिर भूमिपूजनासाठी अयोध्येला जाणार का?; संजय राऊत म्हणतात…
“… तर मुख्यमंत्र्यांनी करोना नष्ट होण्यासाठी विठ्ठलाला साकडं का घातलं?”