Home महाराष्ट्र “… तर मुख्यमंत्र्यांनी करोना नष्ट होण्यासाठी विठ्ठलाला साकडं का घातलं?”

“… तर मुख्यमंत्र्यांनी करोना नष्ट होण्यासाठी विठ्ठलाला साकडं का घातलं?”

मुंबई : राम मंदिराच्या काम लवकरच सुरू होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंदिराच्या कामाचं भूमिपूजन केलं जाणार आहे. यावरुन शरद पवार यांनी नरेंद्र मोदींना टोला लगावला होता. शरद पवारांच्या या विधानानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी ‘जर मंदिर बांधून करोना जाणार नसेल, तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विठ्ठलाच्या चरणी करोना नष्ट होण्याचं साकड का घातलं?’ असा सवाल  शरद पवारांना केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप यांना पूर्ण भान आहे की, कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचे व नाही. देशातील करोनोचा प्रादुर्भाव संपविण्यासाठी सर्वाधिक उपाययोजना मोदी हे करत आहेत. हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची आवश्यकता नाही. मंदिर बांधून करोना जाणार नाही याचे निश्चित भान त्यांना आहे, परंतु आपल्या देव दैवतांचा आशिर्वाद आपल्यासाठी महत्त्वाचे आहे, असं प्रविण दरेकर म्हणाले.

जर मंदिर बांधून व देवाची उपासना करुन करोना जाणार नसेल, तर राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंढरपूर येथे जाऊन विठ्ठलाच्या चरणी महाराष्ट्रातील नव्हे, तर देशभरातील कोरोना जाऊ दे असं साकडं का घातलं? त्याचं उत्तर आपल्याकडे आहे का?,” असा सवाल दरेकर यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी-

राममंदिर भूमीपूजनावरुन शरद पवारांचा मोदींना टोला; म्हणाले…

पालकांनी परीक्षेबाबत चिंता करु नये; लवकरच निर्णय घेऊ- उदय सामंत

“कोरोनामुक्त होताच ‘या’ भाजप आमदाराने केली मोठी घोषणा”

शिवसेना आमदार नरेंद्र दराडे यांना कोरोनाचा संसर्ग; कार्यकर्त्यांसह अधिकाऱ्यांच्या चिंतेत वाढ