Home महाराष्ट्र उद्धव ठाकरे राम मंदिर भूमिपूजनासाठी अयोध्येला जाणार का?; संजय राऊत म्हणतात…

उद्धव ठाकरे राम मंदिर भूमिपूजनासाठी अयोध्येला जाणार का?; संजय राऊत म्हणतात…

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत राम मंदीर भूमिपूजन कार्यक्रमाला जाणार का? हा प्रश्न सध्या विचारला जात आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

उद्धव ठाकरे यांना निमंत्रण मिळाले का, याची चर्चा रंगली आहे. मात्र सध्या फक्त तारीख जाहीर झाली असून राजकीय सोशल डिस्टन्सिंग ठेऊन कार्यक्रम कसा करता येईल, यावर न्याय निर्णय घेईल, असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं.

उद्धव ठाकरे हे नेहमीच रामलल्लांचं दर्शन घेण्यासाठी जातात. ते जेव्हा मुख्यमंत्री नव्हते, तेव्हा गेले होते, मुख्यमंत्री झाले तेव्हा गेले. अयोध्या आणि शिवसेनेचं नातं कायम आहे ते काही राजकीय नातं नाही, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार का, याविषयी स्पष्टता नाही, असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, राजकारणासाठी आम्ही अयोध्येत जात नाही. राम मंदिराचा पूर्ण रस्ता शिवसेनेने तयार केलेला आहे. मंदिरामध्ये येणारे मुख्य अडथळे होते ते शिवसेनेने दूर केले. राजकारण म्हणून नाही, तर श्रद्धा हिंदुत्व या भावनेतून शिवसैनिकांनी बलिदान दिलं. ते आमचं नातं कायम आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“… तर मुख्यमंत्र्यांनी करोना नष्ट होण्यासाठी विठ्ठलाला साकडं का घातलं?”

राममंदिर भूमीपूजनावरुन शरद पवारांचा मोदींना टोला; म्हणाले…

पालकांनी परीक्षेबाबत चिंता करु नये; लवकरच निर्णय घेऊ- उदय सामंत

“कोरोनामुक्त होताच ‘या’ भाजप आमदाराने केली मोठी घोषणा”