Home महाराष्ट्र सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन- जयंत पाटील

सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन- जयंत पाटील

सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आणि नगर पंचायत क्षेत्रात 22 जुलैपासून आठ दिवसांचा लॉकडाऊन असेल. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहतील, असा निर्णय पालकमंत्री जयंत पाटील यांनी घेतला.

सांगलीत बुधवार 22 जुलै रात्री 10 वाजल्यापासून गुरुवार 30 जुलै रात्री 10 वाजेपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी असेल. सांगली जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्याने जयंत पाटील यांनी हा निर्णय घेतला.

दरम्यान, सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात जयंत पाटील, विद्यमान आमदार, खासदार आणि अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

महत्वाच्या घडामोडी-

उद्धव ठाकरे राम मंदिर भूमिपूजनासाठी अयोध्येला जाणार का?; संजय राऊत म्हणतात…

“… तर मुख्यमंत्र्यांनी करोना नष्ट होण्यासाठी विठ्ठलाला साकडं का घातलं?”

राममंदिर भूमीपूजनावरुन शरद पवारांचा मोदींना टोला; म्हणाले…

पालकांनी परीक्षेबाबत चिंता करु नये; लवकरच निर्णय घेऊ- उदय सामंत