अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये अण्णा हजारे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत.
ग्रामविकास विभागाने घटनाबाह्य परिपत्रक काढून जनतेची दिशाभूल केली, असा आरोप अण्णा हजारे यांनी या पत्रात केला आहे. तसेच जर हा निर्णय झाला तर आंदोलन करु, अशा इशाराही अण्णा हजारे यांनी दिला आहे.
ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमताना पालकमंत्र्यांचा सल्ला घ्यावा. तसेच ग्रामविकास विभागाने घटनेची आणि कायद्याची पायमल्ली करुन घटनाबाह्य परिपत्रक काढून जनतेची दिशाभूल केली आहे, असंही अण्णा हजारे यांनी या पत्रात म्हटलं आहे. हा निर्णय घेणाऱ्या मंत्र्याचा गृहपाठ कच्चा राहिला आहे. त्यामुळे त्यांना कायदा, घटना यांचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचा सल्ला अण्णा हजारे यांनी दिला आहे.
दरम्यान, राज्यात पक्षाची, पक्षाने, पक्ष सहभागातून चालविलेली शाही येऊन लोकशाही पायदळी तुडविली जाणार असंही मत अण्णा हजारे यांनी व्यक्त केलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन- जयंत पाटील
उद्धव ठाकरे राम मंदिर भूमिपूजनासाठी अयोध्येला जाणार का?; संजय राऊत म्हणतात…
“… तर मुख्यमंत्र्यांनी करोना नष्ट होण्यासाठी विठ्ठलाला साकडं का घातलं?”
राममंदिर भूमीपूजनावरुन शरद पवारांचा मोदींना टोला; म्हणाले…